खैरेंच्या शुभेच्छांच्या बॅनरमुळे झाकला गेला राजमाता अहिल्याबाईंचा पुतळा, धनगर समाजात तीव्र असंतोष

Foto

औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. खैरेंच्या वाढदिवसानिमित्त शहरात जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र कोकणवाडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोरच खैरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावल्याने पुतळा झाकला गेला. यामुळे धनगर समाजात असंतोष पसरला असून, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

खासदार खैरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात चौकाचौकात बॅनर लावले. मात्र कोकणवाडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोरच बॅनर लावल्याने हा पुतळा झाकल्या गेला आहे. या प्रकारामुळे धनगर समाजात संताप व्यक्त होत आहे. महापालिकेची तुलना ग्रामपंचायतीशी करत महापालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे का असा सवाल धनगर समाजाच्या संघटनांनी उपस्थित केला आहे. सोशल मिडियावर या आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहे.

धनगर समाजाच्या संघटनांनी या घटनेचा अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला आहे.

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker